ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीने दणदणीत विजय ।

  • ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीने दणदणीत विजय ।

ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीने दणदणीत विजय मिळवत बँकेवरील बहुजन विकास आघाडीचे दीर्घकाळाचे वर्चस्व संपुष्टात आणले. अध्यक्षपदी अरुण बाळू पाटील, तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री निलेश भोईर यांची निवड झाली. या विजयामागे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय रणनीतीची चर्चा रंगली आहे. यापूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेचे उमेदवार दोन वेगवेगळ्या पॅनलमधून मैदानात उतरले होते. मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीच्या १४ सदस्यांनी एकत्रित मतदान करत सत्ता आपल्या बाजूने खेचली. विशेष म्हणजे, निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे असलेले भाजपचे किसन कथोरे आणि कपिल पाटील यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकजूट दाखवली.दरम्यान, अध्यक्षपदाच्या मतदानात शिवसेनेचे एक मत फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असली, तरी महायुतीला स्पष्ट बहुमतासह अध्यक्षपद मिळवण्यात यश आले आहे. या निकालामुळे ठाण्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलल्याचे मानले जात असून, बहुजन विकास आघाडीच्या प्रभावाला मोठा धक्का बसला आहे ।