- कल्याण कोळसेवाडी चिकणी पाडा परिसरात सापडले सात दिवसांचे स्त्री जातीचे नवजात सापडले अर्भक ।
कल्याण : कल्याण पूर्वेतील पहाटेच्या सुमारास एक महिला कचरा टाकताना जात असताना चिकणी पाडा परिसरातील मंदिराजवळ झाडाखाली पिशवीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आले नवजात अर्भक महिलेने बाळाला ताब्यात दिले कोळशेवाडी पोलिसांचा तपास सुरू केला असून महिलेने कोणत्या विवेचनातून फेकले त्याचा अनेक चाकोरीतून तपास केला जात आहे.कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिकणी पाडा परिसरात मंदिराजवळ एका पिशवीत गुंडाळलेल्या अवस्थेत नवजात मुलगी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही नवजात मुलगी सात दिवसांची असल्याची माहिती समोर आली आहे .या घटनेमुळे मानवतेला काळीमा फासणारा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. कल्याण पूर्व कोळशेवाडी चिकणी पाडा परिसरातील शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक महिला परिसरात कचरा टाकण्यासाठी जात असताना मंदिराजवळ झाडाखाली तिला संशयास्पद पिशवी दिसली. पिशवीतून अर्भकाचा आवाज ऐकू आल्याने महिलेने तत्काळ पिशवी उघडून पाहिली असता धक्कादायक माहिती समोर आली ।
