- २६ वर्षीय तरुणाची गांधारी पुलावरून उडी , बचावकार्य सुरू ।
कल्याण : कल्याण येथील दत्तामंदिर, चिकनघरचा रहिवासी असलेला २६ वर्षीय मयूर जयराम लिमसे याने शुक्रवारी सकाळी गांधारी पुलावरून नदीत उडी मारली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले की, नदीतील पाण्याची वाढती पातळी आणि जोरदार प्रवाहामुळे दुपारी शोधकार्य काही काळासाठी थांबवावे लागले होते. नंतर, मोठ्या प्रमाणावर शोध पुन्हा सुरू करण्यात आला, परंतु तरुणाचा कोणताही मागमूस लागला नाही. स्थानिकांच्या मते, मयूर अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. व्यसनाधीन तरुण आता आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे? अशी बोलण्याची वेळ आली आहे .या घटनेमुळे , पाण्याची वाढती पातळी आणि जोरदार प्रवाहामुळे बचाव पथकाच्या प्रयत्नांमध्ये अडथळा येत आहे. सध्या, अग्निशमन दल आणि पोलिसांची संयुक्त पथके नदीत शोध घेत आहेत. ही बातमी लिहित असताना बचावकार्य सुरू होते ।
