महात्मा फुले पोलिसांची कारवाई ,गांजा तस्कर महिला गजाआड ।

  • महात्मा फुले पोलिसांची कारवाई ,गांजा तस्कर महिला गजाआड ।

डोंबीवली : कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गांजा तस्कर महिलेला बेड्या ठोकल्यात. अनिता लव्हाळे असे या महिलेचे नाव असून ती मूळची सोलापूरची असून ती तळोजा येथे वास्तव्यास होती . तिच्याजवळ महात्मा फुले पोलिसांनी झडती दरम्यान अडीच किलो गांजा हस्तगत करून गजाआड केली . धक्कादायक म्हणजे परकरच्या कप्प्यात गांजा लपवून ती गांजा तस्करी करत होती . एक महिला ओडिसाहुन येणाऱ्या ट्रेनने गांजा विक्रीसाठी कल्याण रेल्वे स्टेशनवर येणार असल्याची माहिती कल्याण महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती .या माहितीच्या आधारे पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला अनिता दिसताच पोलिसांना संशय बळावला महात्मा फुले पोलिसांच्या पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिची झडती घेतली असता तिच्याजवळ अडीच किलो गांजा आढळून आला हा गांजा तिने ओडिसाहून आणून विकत असे ।