- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त टोरेंट पॉवरच्या महिला कर्मचाऱ्यांचा ‘गिव्ह टू गेन (Give to Gain)’ उपक्रम ।
ठाणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त टोरेंट पॉवर लिमिटेड च्या महिला कर्मचाऱ्यांनी समाजाशी जिव्हाळ्याचा संबंध दृढ करत “गिव्ह टू गेन” या संकल्पनेवर आधारित एक विशेष सामाजिक उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत महिला टोरेंटियन्सनी विविध वृद्धाश्रम तसेच एका बालिकाश्रमाला भेट देत तेथील रहिवाशांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत केले.
या उपक्रमादरम्यान खालील संस्थांना भेट देण्यात आली:
* वनप्रस्थी आश्रम, आनगाव
* मातोश्री वृद्धाश्रम, खडवली
* स्वामी शांती प्रकाश वृद्धाश्रम, उल्हासनगर
* उपवन ओल्ड एज होम, ठाणे
* श्री साईधाम वृद्धाश्रम, खिडकाळी
* बालिकाश्रम, आनगाव
या भेटीदरम्यान आश्रमातील ज्येष्ठ नागरिक आणि बालिकांसोबत संवाद, खेळ, संगीत तसेच विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून सर्व सहभागींच्या संवादातून एक आपुलकीचे, आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. “गिव्ह टू गेन” या संकल्पनेचा प्रत्यय या उपक्रमातून आला. महिला कर्मचाऱ्यांनी आपला वेळ, सहवास आणि आपुलकी देत आश्रमातील रहिवाशांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला; तर त्याबदल्यात त्यांना ज्येष्ठांचे आशीर्वाद, त्यांच्या जीवनानुभवांतून मिळालेली शिकवण आणि समाजाविषयी अधिक संवेदनशीलतेची जाणीव मिळाली. हा उपक्रम टोरेंट पॉवरच्या महिला कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास आणि सशक्तीकरणासाठीही एक प्रभावी व्यासपीठ ठरला. कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय, संवाद आणि नेतृत्व अशा विविध बाबींमध्ये सहभागी होताना कर्मचाऱ्यांना त्यांच्या संघटनात्मक व व्यक्तिमत्त्व कौशल्यांचा विकास करण्याची संधी मिळाली. आश्रमातील रहिवासी आणि स्वयंसेवक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम संस्मरणीय ठरला. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत समाजाशी भावनिक नाते अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला ।
