- आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश, बेलापूर येथील अर्बन हाट अखेर सुरू।
प्रमोद कुमार
नवी मुंबई – राज्य शासनाच्या लघू उद्योग विकास विभागाकडे ‘बेलापूर’च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पर्यावरणाला धक्का न लावता नवी मुंबई महापालिका क्षेत्रात बेलापूर रेल्वे स्थानकाजवळील १२ एकरच्या टेकडीवर उभारण्यात आलेल्या ‘कलाग्राम (अर्बन हाट)’ला ‘सिडको’ने लावलेले टाळे अखेर उखडले. त्याची आज प्रचिती म्हणून वस्त्रोउद्योग विभागाच्या वतीने राष्ट्रीय गांधी शिल्प बाजार कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्याचे आज उद्घाटन वस्त्रोउद्योग मंत्री माननीय संजय सावकरे साहेब प्रमुख उस्पथितीत पडले. कोरोना काळानंतर ‘सिडको’ने बंद ठेवलेले अर्बन हाट आज पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे महिला बचत गट, असंख्य हातमाग आणि हस्तकला कलाकारांची हक्काची बाजारपेठ निर्माण झाली आहे. त्याअनुषंगाने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये हर्बन हाट सुरु करण्यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात विशेष मागणी केली होती. त्यामुळे महिला बचत गटांना आणि असंख्य हस्तकला, हातमाग कलाकारांना हक्काची बाजारपेठ पुन्हा उपलब्ध झाली असून राज्यासह विविध राज्यातील उत्पादकांना सुगीचे दिवस आले आहेत. तसेच राष्ट्रीय गांधी शिल्प बाजार या प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन हातमाग कलाकारांनी बनविलेल्या वस्तूंची खरेदी करावी असे आवाहन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे. तसेच सीबीडी येथील ‘कलाग्राम (अर्बन हाट) सुरु झाल्याने सर्व हातकाम कामगारांनी व उत्पादकांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांच आभार मानले आहे ।
