केडीएमसीच्या महासभेत दिल्ली आंदोलनाचा पडसाद, शिवसेना उद्धव आणि मनसे नगरसेवकांचा गोंधळ , गोंधळामुळे महासभेचे कामकाज तहकूब ।

  • केडीएमसीच्या महासभेत दिल्ली आंदोलनाचा पडसाद, शिवसेना उद्धव आणि मनसे नगरसेवकांचा गोंधळ , गोंधळामुळे महासभेचे कामकाज तहकूब ।

कल्याण : दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ देशभरात आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाचा पडसाद गुरुवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) महासभेतही उमटला. महासभेला सुरुवात होताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. हात राष्ट्रीय ध्वज घेऊन “इंकलाब जिंदाबाद”च्या घोषणा देत विरोधी नगरसेवकांनी महासभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सद्यस्थिती लक्षात घेऊन केडीएमसीच्या महापौर अॅड. हर्षाली विजय चौधरी यांनी महासभा सुरुवातीला १० मिनिटांसाठी तहकूब केली. मात्र कामकाज पुन्हा सुरू होताच शिवसेना (उद्धव) आणि मनसे नगरसेवकांनी पुन्हा घोषणाबाजी सुरू केली. त्याला उत्तर म्हणून भाजपच्या नगरसेवकांनी “वंदे मातरम” आणि “जय श्रीराम”च्या घोषणा दिल्या. सभागृहात काही वेळ गोंधळ सुरू राहिल्यानंतर काही अत्यावश्यक विषयांवर मंजुरी दिल्यानंतर महापौरांना महासभेचे कामकाज तहकूब करावे लागले ।