- डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण, शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे अटकेत ।
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांवर झालेल्या मारहाण प्रकरणात विष्णुनगर पोलिसांनी बुधवारी दुपारी मुख्य आरोपी तथा शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना अटक केली. या कारवाईची माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. या प्रकरणात यापूर्वीच नगरसेवक म्हात्रे यांच्यासोबत रुग्णालयात धुडगूस घालणाऱ्या तिघा समर्थकांना पोलिसांनी अटक केली होती. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रमेश लक्ष्मण पवार (५०), प्रकाश उर्फ प्रकाश उद्धव निकम (३५) आणि अक्षय शरद कारंडे (३०) यांना मंगळवारी उशिरा रात्री ताब्यात घेण्यात आले होते
।