लोकलच्या धडकेत झालेल्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणाला राज पकड याला अटक करून कल्याण न्यायालयात हजर , 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ।

  • लोकलच्या धडकेत झालेल्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणाला राज पकड याला अटक करून कल्याण न्यायालयात हजर , 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ।

डोंबीवली : कोपर-दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान 2 ऑगस्ट रोजी लोकलच्या धडकेत झालेल्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला अपघात मानल्या गेलेल्या या घटनेचा तपास करताना पोलिसांना हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले. पोस्टमार्टेम अहवालात मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. मोबाईलमधील चॅटिंगच्या आधारे पोलिसांनी डोंबिवलीतील राज पकड या तरुणाची चौकशी केली. इंस्टाग्रामवरून दोघांची ओळख झाली होती आणि पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याची माहिती तपासात समोर आली. चौकशीनंतर राज पकड याला अटक करून कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. डोंबिवली जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासातून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे ।