- बदलापूरात जनगणनेच्या कामात हलगर्जी करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल ।
बदलापुर : केंद्र सरकारने जनगणना सुरू केली आहे त्यात शासकीय निम शासकीय आणि खाजगी संस्थेतील नोकर वर्गाला प्रशिक्षण देऊन जनतेच काम सोपवले आहे मात्र काही जण कामात कुचराईपणा करत आहेत . २०२७ च्या जनगणनेपूर्वी सुरू करण्यात आलेल्या घर गणती मोहिमेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांविरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. संबंधित कर्मचाऱ्यांना वारंवार नोटीस देऊन तसेच फोनद्वारे संपर्क साधूनही त्यांनी कर्तव्यावर हजर राहण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणीपुरवठा अधिकारी व्ही. एस. सांबळे आणि बी. जी. जाधव यांचा समावेश आहे. तसेच बदलापूरातील नामांकित खासगी शाळांमधील तीन शिक्षिकांवरही कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये हेवन बेल कॉन्व्हेंट स्कूलच्या दिपावली सविओ दामोदरे, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या अर्चना दिनेश मराडे आणि शिरगाव येथील एस.डी.एम. हायस्कूलच्या पूजा चेतन चव्हाण यांचा समावेश आहे. शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत ।
