शिवसेना युवासेनेत कल्याण लोकसभा मतदारसंघात महत्त्वाच्या पदनियुक्त्या, ऋषिकेश पाटील लोकसभा सचिव, तर भुषण यशवंतराव कल्याण पूर्व शहराध्यक्ष ।

  • शिवसेना युवासेनेत कल्याण लोकसभा मतदारसंघात महत्त्वाच्या पदनियुक्त्या, ऋषिकेश पाटील लोकसभा सचिव, तर भुषण यशवंतराव कल्याण पूर्व शहराध्यक्ष ।

डोंबिवली : केडीएमसी निवडणुकीत यश मिळाले नंतर आता युवकांचा सहभाग आणि पक्ष संघटना वाढीसाठी युवासेना मध्ये संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाच्या पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या.यामध्ये ऋषिकेश पाटील यांची युवासेना लोकसभा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून भुषण यशवंतराव यांची युवासेना कल्याण पूर्व शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीपत्रांचे वितरण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन पदाधिकाऱ्यांनी युवासेनेची भूमिका तळागाळापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कल्याण परिसरात युवकांना संघटित करून विविध सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. पदनियुक्तीबद्दल कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला ।