- नगरसेवक दीपेश पुंडलीक म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दीपेश म्हात्रे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.।
डोंबिवली : आज दिनांक ४ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे साडेदहा वाजता, नगरसेवक दीपेश पुंडलीक म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दीपेश म्हात्रे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष नंदू परब, मनसेचे गटनेते प्रल्हाद म्हात्रे, जयेश म्हात्रे, नगरसेविका हर्षदा भोईर, नगरसेविका ज्योती पवन पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दीपेश म्हात्रे यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.या प्रसंगी कार्यकर्ते व नागरिकांनीही मोठ्या उत्साहात उपस्थित राहून दीपेश म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
