नगररचना विभागातून वादग्रस्त युसुफ हाईट्स इमारतीची संपूर्ण फाईलच गायब झाल्याने मोठी खळबळ ।

  • नगररचना विभागातून वादग्रस्त युसुफ हाईट्स इमारतीची संपूर्ण फाईलच गायब झाल्याने मोठी खळबळ ।

प्रमोद कुमार 

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभागातून वादग्रस्त युसुफ हाईट्स इमारतीची संपूर्ण फाईलच गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पालिकेने बाजारपेठ पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर परिसरात विकासक सलमान डोलारे आणि फराज महमूद यांनी ७ मजली परवानगी घेऊन प्रत्यक्षात १० मजली इमारत उभारल्याचा आरोप आहे. वरच्या तीन मजल्यांवरील घरांची विक्री करून आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. नगररचना विभागाकडील चौकशीत इमारतीचे तीन मजले अनधिकृत असल्याचा अहवाल देण्यात आला होता. मात्र तीन वर्षांत कोणतीही कारवाई झाली नाही. आता त्या इमारतीची संपूर्ण अधिकृत कागदपत्रांची फाईलच गायब झाल्याचे समोर आल्याने संशय वाढला आहे. दरम्यान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर आज फॉरेन्सिक टीम केडीएमसी मुख्यालय दाखल झाली. नगररचना विभागात तपास केला असून तपासाअंती फाईल चोरीला गेली की निष्काळजीपणामुळे हरवली? हे पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे ।