- डोंबिवली स्थानक परिसरातील अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर धडक कारवाई ।
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील डोंबिवली (पू.) कडील रेल्वे स्थानक परिसरात उद्भवणाऱ्या फेरीवाल्यांच्या तक्रारीला पायबंद घालण्यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार ६/फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकुर यांनी आज सकाळ पासून १७ हातगाड्या जप्त करण्याची कारवाई केली. तर ८/ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी रेल्वे स्थानक परीसरातील रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करुन १० हातगाड्या, २७ भाजीचे कॅरेट, ३० टांगन्या, २० शेड, ०५ गॅस सिलेंडर, १२ कपड्याची बोचकी, २७ प्लाय व ०८ लाकडी बॉक्स इत्यादी सामान जप्त करुन प्रभाग कार्यालयात जमा केले.डोंबिवली (पू.) रेल्वे स्थानक परिसरात अतिक्रमण केल्यास अशी कारवाई पुढेही चालू राहील अशी माहिती ६/फ व ८/ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी दिली आहे ।
