डोंबिवलीकरांचा प्रवास आता सुसाट होणार असून केवळ 20 रुपयांत ठाणे गाठता येणार आहे ।

  • डोंबिवलीकरांचा प्रवास आता सुसाट होणार असून केवळ 20 रुपयांत ठाणे गाठता येणार आहे ।

डोंबिवली : डोंबिवलीकरांचा प्रवास आता सुसाट होणार असून केवळ 20 रुपयांत ठाणे गाठता येणार आहे. या बस सेवेच्या निमित्ताने भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्याची कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. आम्ही सर्व एकत्र आल्याने बऱ्याच लोकांना आता गुदगुल्या होणार, असा खोचक टोला चव्हाण यांनी लगावला आहे. त्यांच्या या विधानाचा रोख नेमका कोणाकडे आहे, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. लोकल ट्रेनमधील तुडुंब गर्दी आणि धक्काबुक्कीमुळे डोंबिवलीकरांचे हाल होतात. अनेकदा या गर्दीमुळे प्रवाशांना जीवही गमवावा लागला आहे. ही जीवघेणी गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी डोंबिवली ते ठाणे बस सेवा सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. अखेर या मागणीला यश आले असून बुधवारपासून ही सेवा अधिकृतपणे सुरू झाली आहे. स्वामीनारायण सर्कल ते ठाणे असा हा प्रवास असणार असून यासाठी प्रवाशांना केवळ 20 रुपये मोजावे लागणार आहेत.
भाजपाचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी या बस सेवेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने डोंबिवलीकरांनी समाधान व्यक्त केले आहे. या बस सेवेचा शुभारंभ भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. डोंबिवलीकरांचा प्रवास आता सुसाट होणार असून केवळ 20 रुपयांत ठाणे गाठता येणार आहे. या बस सेवेच्या निमित्ताने भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्याची कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. आम्ही सर्व एकत्र आल्याने बऱ्याच लोकांना आता गुदगुल्या होणार, असा खोचक टोला चव्हाण यांनी लगावला आहे. त्यांच्या या विधानाचा रोख नेमका कोणाकडे आहे, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. लोकल ट्रेनमधील तुडुंब गर्दी आणि धक्काबुक्कीमुळे डोंबिवलीकरांचे हाल होतात. अनेकदा या गर्दीमुळे प्रवाशांना जीवही गमवावा लागला आहे. ही जीवघेणी गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी डोंबिवली ते ठाणे बस सेवा सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. अखेर या मागणीला यश आले असून बुधवारपासून ही सेवा अधिकृतपणे सुरू झाली आहे. स्वामीनारायण सर्कल ते ठाणे असा हा प्रवास असणार असून यासाठी प्रवाशांना केवळ 20 रुपये मोजावे लागणार आहेत.भाजपाचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी या बस सेवेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने डोंबिवलीकरांनी समाधान व्यक्त केले आहे. या बस सेवेचा शुभारंभ भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला ।