- ठाणे पोलीस आयुक्तालय ,परिमंडळ ३ कल्याण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अंतर्गत कल्याणात विद्यार्थी सुरक्षा ,उपयोजना मार्गदर्शन शिबिर ।
डोंबिवली : कल्याण डोंबिवली सुरक्षित विद्यार्थी ,सुरक्षित शाळा,सुरक्षित प्रवास बैठकीस कल्याण डोंबिवलीतील शाळांचे प्रतिनिधी,बस मालक चालक, आर टी ओ अधिकारी ,वाहतुक पोलीस उपस्थित , डी. सी.पी अतुल झेंडे यांनी केलं नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले . कल्याण–डोंबिवली परिसरात विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य देत विशेष विद्यार्थी सुरक्षा व उपयोजना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन कल्याणच्या का के.सी.गांधी शाळेत करण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्तालय ,परिमंडळ ३ कल्याण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिरात पोलिस उपायुक्त अतुल झेंडे , एसीपी कल्याणजी घेटे ,पोलीस अधिकारी , केडीएमसी उपायुक्त प्रसाद बोरकर ,शहरातील विविध शाळांचे प्रतिनिधी, स्कूल बस मालक व चालक, आर टी ओ अधिकारी तसेच वाहतूक पोलीस,पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा शाळेकडे आणि शाळेतून घरी सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी आवश्यक नियम, खबरदारी आणि कायदेशीर तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्कूल बसची तांत्रिक तपासणी, चालकांचे परवाने, वेग मर्यादा, बसमध्ये सीसीटीव्ही, अग्निशामक यंत्रणा, महिला सुरक्षा उपाय अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या वेळी उपायुक्त अतुल झेंडे यांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करत, “विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे स्पष्ट केले. नियमभंग केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला ।
