- केडीएमसी मुख्यालयासमोर मोबाईल टॉवर बाबत आयुक्तांना तक्रार
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यालयासमोरील शंकरराव चौक येथील वाहतूक बेटावर प्रस्तावित मोबाईल टॉवरला नागरिकांचा तीव्र विरोध आहे. शाळा, निवासी परिसर व ज्येष्ठ नागरिकांच्या वस्तीत टॉवर उभारणीमुळे EMF Radiation मुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याची नागरिकांची ठाम भूमिका आहे. याबाबत आयुक्त अभिनव गोयल यांना निवेदन देऊन टॉवर येथून हटवून पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी ।कल्याण डोंबिवली महापालिकेच्या समोर शंकर चौकात मोबाईल टॉवर उभारला आहे या टॉवर ला सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी करून विरोध होत आहे त्यात याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते वल्ली राजन, दिनेश परदेशी, संतोष पाटील, गोरक्ष शिंदे व तोषेश लक्ष्मीपती शुक्ला यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका चे माननीय आयुक्त अभिजीत गोयल यांच्याकडे निवेदन सादर करून सदर परवानगीचा तात्काळ पुनर्विचार व टॉवरसाठी पर्यायी, सुरक्षित ठिकाण निश्चित करण्याची मागणी केली आहे.नागरिकांच्या आरोग्याला व सार्वजनिक सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे आयुक्तांकडे .कल्याण डोंबिवली महानगरपालिका या तक्रार कडे कशा प्रकारे पाहते हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे ।
