- कल्याण पूर्वेत बनावट नोटांच्या आमिषाने ५ लाखांची लूट – आठ जणांच्या टोळीला पोलिसांचा दणका
कल्याण : रक्कमेच्या बदल्यात जास्तीचे पैसे देण्याचे आमिष दाखवत बनावट नोटांचा व्यवहार करण्याच्या बहाण्याने तब्बल ५ लाख रुपयांची लूट करणाऱ्या आठ जणांच्या टोळीला अखेर कोळसेवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले. या कारवाईत रोख रक्कम ,दोन स्कॉर्पिओ गाड्या आणि मोबाईल जप्त करण्यात आले असून इतर आरोपीला शोध सुरू आहे. पोलिसांनी आरोपींना मोठ्या शिताफीने गजाआड केले आहे . तक्रारदार दीपक शिंदे ( रा. वाघोली ,पुणे ) यांना आरोपींनी ७ लाख रुपयांच्या बदल्यात १० लाख १० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले होते. या व्यवहारासाठी त्यांना कल्याण पूर्व येथे बोलावण्यात आले. तक्रारदार ५ लाख रुपये घेऊन विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात पोहचले असता, स्कॉर्पिओमधून आलेल्या तीन – चार इसमांनी पोलिस असल्याचे भासवून त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावली आणि क्षणार्धात पसार झाले. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्र. १०३/२०२६ भा.न्या.स. ३१० (२),३०९(४)(६),२०४,३(५) अन्वल्ये दाखल करून तपासाची सूत्रे हाती घेतली. संजय नागोजीराव भोसले ( वय ५६ रा. गौरीपाडा,कल्याण ) , गॉसपाक गुलाम हुसेन शेख ( वय ४६, रा. गौरीपाडा,कल्याण ) ,सोमनाथ तुळशीराम गायकवाड ( वय ५० , रा. मोहने,आंबिवली पू.) ,अरविंद नाथा जोज्जट ( वय ३८ , रा. इंदिरानगर ,कल्याण प.) यांचा या गुन्ह्यात समावेश आहे. तपासादरम्यान अन्य आरोपी अहिल्यानगर मार्गे अमदानगरकडे दुसऱ्या स्कॉर्पिओ ( एम.एच. – ०५ / ए. जे. ०२४७ ) ने पसार झाल्याचे उघड झाले अहमदनगर – शिर्डी रोडवर नाकाबंदी करून पुढील आरोपींना अटक करण्यात आली – उमाशंकर हनुमान प्रसाद पांडे उर्फ पप्पू पांडे ( वय ५१,रा.वडोळगाव,उल्हासनगर ) शरदकुमार मोहन ( वय ४६ वर्ष रा. ओटी सेक्शन ,उल्हासनगर ) ,नरेश पद्दू शर्मा ( वय ४५ वर्ष ,रा.ओटी सेक्शन ,उल्हासनगर ) , लक्ष्मण उर्फ प्रदीप विश्वनाथ धनवे ( वय ३८ वर्ष रा. उल्हासनगर ) यास कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून लुटीतील २ लाख ३६ हजार रुपये,दोन स्कॉर्पिओ गाड्या व एकूण १० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कमेचा आणि इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ही कारवाई पोलिस उपयुक्त अतुल झेंडे,सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे,वरिष्ठ पोलिस हेमंत गुरव, गुन्हे निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलिस पथकाने यशस्वी पार पाडली ।
